ई. स. १६१६ च्या रोशनगावच्या लढाईत† सपाटून मार खाल्ल्यानंतर मलिक अंबरने आपले गमावलेले मराठा सरदार परत मिळवण्याचा प्रयत्न चालवला. त्यात वर्षभरात त्याला यश मिळालं. लखुजीराजे, उदाराम पंडित आणि बाबाजी कायथ यांनी मुघल छावणी सोडून निजामशाहीत पुनः प्रवेश केला. पण काही काळातच मलिक अंबर आणि मराठ्यांच्या ह्या गटातील मतभेद पुन्हा वर येऊ लागले. मलिक अंबरने बाबाजी कायथची कपटाने हत्या करवली. आणि राजे उदाराम यांना मारण्यासाठी सैन्य पाठवले. उदारामांनी त्या सैन्याचा पराभव केला. आणि निजामशाही मुलुखात धोका असल्याचे जाणून आदिलशहाशी पत्रव्यवहार सुरू केला. पण मलिक अंबर आणि आदिलशहाचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याने आदिलशाही दरवाजे त्यांच्यासाठी बंद झाले होते. अखेर मुघल सुभेदार खान खानान याच्याशी बोलणी करून उदाराम मुघल छावणीत दाखल झाले. इकडे रोशनगावची लढाई संपते न संपते तोच जहाँगीर बादशहाने आपला मुलगा खूर्रम याला दक्षिणेत पाठवले. १६ ऑक्टोबर १६१६ रोजी शहजादा खुर्रम अजमेर हून निघाला आणि ई. स. १६१७ च्या सुरुवातीला बुऱ्हाणपूरात येऊन दाखल झाला. बुऱ्हाणपूरला पोहोचताच त्याने मलिक अंबर विरुद्ध
वऱ्हाड म्हणजे विदर्भ नव्हे. वऱ्हाड हा आजच्या विदर्भातला पश्चिमेकडचा प्रदेश. वऱ्हाड चे इंग्रजी रूप बेरार (berar) . वऱ्हाड एकेकाळी समृद्ध होता. वऱ्हाडात जिजाबाईंचे माहेर आहे. राजे उदाराम आणि राजे लखुजी जाधवरावांची जहागीरी वऱ्हाडात होती. वऱ्हाडातील काही ऐतिहासिक व्यक्तींच्या जीवनावर अभ्यासपूर्ण लेख आपल्याला “वऱ्हाडनामा” येथे वाचायला मिळतील.