Skip to main content

Posts

Showing posts from June, 2021

वऱ्हाडातील संतपरंपरा १ - मियाँसाहेब महाराज

🌸~~~वऱ्हाडातील संतपरंपरा !~~~🌸 “कुवतअलिशहा मियाँसाहेब उर्फ मियाँसाहेब महाराज” अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात, अकोट शहराच्या वायव्येस काही मैलांवर ‘उमरा’ नावाचे गाव आहे. तिथे संत कुवतअलिशहा मियांसाहेब यांची समाधी आहे. मियांसाहेब महाराज हे मूळचे पंजाबचे होते. इसवी सन १८५० च्या सुमारास ते उमरा येथे आले. ते महाराष्ट्रात कसे व का आले, याची इतिहासाला माहिती नाही. पण अकोटचे प्रसिद्ध संत नरसिंह महाराज तसेच दिवठाणा, अडगावचे संत एकनाथ महाराज यांचे ते गुरु होते. अकोट येथे दरवर्षी शेकडो भाविक भक्तांच्या उपस्थितीत नरसिंह महाराजांची यात्रा भरत असते. “लोकांना सर्वप्रथम मियाँसाहेब महाराज  कसे ज्ञात झाले ?” रात्रीच्या वेळी उमरा गावात एक अवलिया येऊन भिक्षा मागत असत. पण त्यांची भिक्षा मागायची पद्धत जरा निराळी होती. “हाजिर हूआ तो भेज ” असं मोठ्याने ओरडून ते ‘मी असेपर्यंत भिक्षा आणून दे’ अशी मागणी करीत असत. पूर्वी दारात आलेल्या प्रत्येक अतिथीचे यथातथ्य सोपस्कार करण्याची पद्धत असे. त्यामुळे लोक घाईघाईने त्यांच्यासाठी भिक्षा घेऊन जात. पण दारात पोहोचेपर्यंत ते महाराज तिथून निघून गेलेले असत. बरेच दिवस हे च