Skip to main content

Posts

Showing posts from September, 2020

पहिला पराभव - भातवडीचे युद्ध

                ई. स. १६२४ मध्ये आदिलशाही आणि निजामशाही यांच्यातील वैमनस्य कळसाला पोहोचले होते. आपली ताकद वाढावी म्हणून दोघांनीही दख्खनचा मुघल सुबेदार ‘महाबतखान’ याची मदत घेण्याचा भरपूर प्रयत्न केला. दोन्ही शाह्यांनी मुघलांना सहाय्य देऊ करण्याचे आश्वासन दिले. मलिक अंबरने आपला दूत आली शेर, तर अली आदिलशहाने आपला मुख्य सरदार ‘मुल्ला मुहम्मद लारी’ यांना महाबतखानाकडे पाठवले. मलिक अंबर महाबतखानाच्या भेटीसाठी स्वतः देऊळगाव येथे येऊन राहिला. पण महाबतखनाने आदिलशहाशी तह केला आणि मलिक अंबरच्या प्रस्तावाला चूल दाखवली. मुघल आणि आदिलशाह यांच्यातील तहाने मलिकची झोप उडवून टाकली. ठरल्याप्रमाणे मुल्ला महम्मद लारीसोबत सोबत आदिलशाहने ५००० घोडदळ पाठवलं. मलिक अंबरने मध्येच लारीला गाठू नये म्हणून राजे लखुजी जाधवराव आणि राजे उदाराम यांना बालाघाट( माहूर पुसद घाट) येथे पाठवण्यात आले. मलिक अंबरने हवेची दिशा बघितली होती. येत्या काळात आदिलशाही आणि मुघल दोन्ही फौजांशी एकाच वेळी लढावे लागणार आहे याचा त्याने अंदाज बांधला होता. त्याने निजामशहाला खडकीहून ( आजचे औरंगाबाद) देवगिरी किल्ल्यावर नेऊन ठेवलं खडकी शहर रिकामं के