Skip to main content

Posts

Showing posts from March, 2020

मराठ्यांचे महत्त्व २ : रोशनगांवची लढाई !

माहूर येथील किल्ल्याचा हत्ती दरवाजा            ई. स.१६१२ मध्ये अंबराने आपली राजधानी देवगिरीहून खडकीला हलवली. मलिक अंबराच्या सैन्याकडून अनेकदा पराभूत झाल्यानंतर मोगलांना अंबराची खरी ताकद कळू लागली होती. याच दरम्यान मलिक अंबर आणि मराठा सरदारांच्या एका गटामध्ये मतभेद उत्पन्न होऊ लागले होते. लखुजी जाधवराव आणि उदाजीराम हे त्यात मुख्य होते. त्यांच्यात नेमके काय मतभेद होते, हे ज्ञात नाही. पण याचा बराच फायदा मोगलांना झाला, हे मात्र निश्चित. पराजयाची मालिका कशी थांबवावी या पेचात असताना जहांगीर बादशहाने पुन्हा खान इ खानानला दख्खनचा सुभेदार नेमलं. खान इ खानान मोगलांमध्ये दख्खनचा जाणता होता. त्याच्या तीन मुलांना मनसबदारी आणि बक्षिसे देऊन त्याला मलिक अंबराचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवण्यात आलं. बाळापूर येथे मोगली सैन्याचा तळ पडला. आधीचे पराभव तो विसरला नव्हता. आता त्याने शांततापूर्ण पावलं उचलण्याचा निर्णय घेतला. पूर्वीप्रमाणेच मोगली सरदारांमध्ये आपसांत मतभेद, द्वेष ई. कायम होते. त्याने हळूहळू ही डोकेदुखी कमी केली. एक एक करून सरदार मरू लागले. आपल्या विरोधकांना संपवल्यावर आता खान इ खानान मलिक अं

मराठ्यांचे महत्त्व १ : मलिक अंबर !

 देवगिरी किल्ल्याचे भग्नावशेष          मलिक अंबराच्या कारकिर्दीतील निजामशाहीचा इतिहास म्हणजे मुघल आणि दख्खनी शाह्या यांच्यातील संघर्षाचा इतिहास आहे. मलिक अंबराने निझाम, आदिल, कुतुब या तिन्ही शह्यांना एकत्र आणून मुघलांना जवळजवळ वीस वर्ष दख्खन काबीज करण्यापासून रोखून धरलं. गनिमी कावा युद्धतंत्राने त्याने मुघली फौजांना हैराण करून सोडलं. आणि त्यात त्याला सगळ्यात जास्त मदत झाली ती मराठ्यांच्या चपळ सैन्याची. ह्या कारणामुळे अंबराच्या कार्यकाळात मराठ्यांचा उदय झाला. पण याचा अर्थ मलिक अंबराचे मराठ्यांवर काही विशेष उपकार आहेत असा होत नाही.            ई. स. १६०७ मध्ये मलिक अंबराने राजू दख्खनीला कैद करून त्याच्या अखत्यारीतला मुलुख निजामशाही राज्याला जोडला आणि संपूर्ण निजामशाही सत्ता आपल्या वर्चस्वाखाली आणली. पुढे मुर्तझा निझामशाह दुसरा याच्याशी असलेले मतभेद संपवून त्याने आपला मोर्चा मोगलांकडे वळवला. तोपर्यंत मुघलांनी अहमदनगर आणि बराच निजामशाहीचा मुलुख काबीज केला होता. ई. स. १६०५ मध्ये अकबराच्या मृत्यूनंतर जहांगीर गादीवर आला, पण सुरूवातीची काही वर्षे तो शाहजादा खुसरौच्या बंडामुळे आणि पर्शिय

माहूरचे राजे उदाराम

“माहूर येथील हत्तीखाना”                 मध्ययुगीन वऱ्हाडच्या राजकारणात लखुजी जाधवराव यांच्यानंतर नाव येते माहूरच्या राजे उद्धवजी रामजी उर्फ राजे उदाराम (Raja Udaram) यांचं. इसवी सनाच्या १७व्या-१८व्या शतकात वऱ्हाडात एक अनंत नावाचे कवी होऊन गेले. त्यांच्या “भक्तरहस्य” या काव्यात माहूरच्या राजे उदाराम यांच्या भाग्योदयाची कथा आढळते. भक्तरहस्यातील सगळाच भाग विश्वसनीय वाटत नाही. त्यामुळे यात निवडक भाग घेतलेला आहे. उदाजीराम यांचे मूळ नाव उद्धवजी रामजी. जसे मुघल कागदपत्रांमध्ये जाधवराव चे ‘जदूराय’ झाले, तसेच उद्धवजी रामजीचे ‘उदाजीराम’ झालेले आहे. सुरुवातीच्या काळात हे उदाजीराम वाशिम जवळच्या सावरगावचे कुळकर्णी होते. आजचे औरंगाबाद म्हणजे त्याकाळचे खडकी हे शहर अहमदनगरच्या निजामशाहीतील एक महत्त्वाचे शहर. भक्तरहस्यानुसार पद्माजी नावाच्या एका सत्पुरूषाच्या सांगण्यावरून उदाजीराम खडकी येथे आले. आपले कुळकर्णी पद सोडून खडकीला आल्यावर उद्धवजींनी एका अमीराचा वसिंदा म्हणजे लेखक म्हणून काम केले. खडकी मध्ये उदाजींनी प्रतिष्ठा कमावली. याच काळात त्यांनी सैनिकी शिक्षण घेतले असावे.  काही काळातच त्यांनी एक