Skip to main content

Posts

Showing posts from June, 2020

शहाजहानचे बंड आणि वऱ्हाडकर मराठे

नरनाळा किल्ला                       ई. स. १६२१ मध्ये दक्षिणेत विजय मिळवून आलेल्या आपल्या मुलाला - खुर्रमला - जहाँगीर बादशहाने शहाजहान हा खीताब दिला तेव्हा त्याला आपल्याच घरात निर्माण होणाऱ्या यादवीची कल्पना देखील नसेल. काहीच वर्षे आधी मलिक अंबराचा पराभव करून आलेल्या आणि निजामाचा दरबार सोडून आलेल्या मराठा सरदारांवर आपण जो कृपेचा वर्षाव केला, त्याची परतफेड आपल्याच विरोधातील उठावाला सहाय्य करून हे कपटी मराठे करतील, याचाही त्याने कधी विचार केला नसेल. १६२१ च्या मध्यापासूनच जहाँगीराची पत्नी नुर जहान शहाजहान विरुद्ध राजकारण खेळू लागली होती. त्याची भिती डोक्यात शिरल्यामुळेच शहाजहान ने बंड करण्याचा निर्णय घेतला. त्याचा उत्तरेतील जहागिरीचा मुलुख कमी करून तेवढ्याच जहागिरीचा मुलुख त्याला दख्खन मध्ये देण्यात आला, कंदाहरकडे जाण्याची आज्ञा दिली गेली आणि त्याने तिकडे जाण्यास नकार दिल्यावर जेव्हा वारंवार त्याच्याकडे कंदाहरच्या स्वारीसाठी सैन्य पाठवून देण्याची मागणी होऊ लागली, तेव्हा त्याने बंडाचा झेंडा उभारला. त्या बंडात त्याला दक्षिणेतील सरदारांचे सहाय्य होते.  त्यात दोनच मराठा सरदारांचा उल्लेख येतो.