अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्याच्या पूर्वेस १२ किमीवर अडगांव बुद्रुक नावाचं गाव आहे. गेल्या शतकभरापासून वऱ्हाडच्या संतपरंपरेच्या इतिहासातील एक सोनेरी पान येथे विसावा घेते आहे. भास्कर महाराज हे सद्गुरू श्री गजानन महाराजांचे पट्टशिष्य. त्यामुळे या गुरुशिष्यांच्या उल्लेखावाचून वऱ्हाडच्या संतपरंपरेचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. गजानन महाराज आणि योगमार्ग ह्या लेखात काही विषयांवर चर्चा करत त्यांचा उहापोह करण्याचा प्रयत्न केला आहे. गजानन महाराजांच्या सान्निध्याचं गांभीर्य समजून घेण्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचं आहे. या हिंदुभूने हजारों वर्षे खत पाणी घालून वाढविलेल्या योगविज्ञानाच्या वृक्षाचे भास्कर महाराज हे एक फळ आहेत. या भूमीवर हजारो योगी होऊन गेले. त्यांनी कायम जनसामान्यांच्या आयुष्यात आध्यात्मिक ज्योत पेटविण्याचा प्रयत्न केला. मग ते आदियोगी शिव असोत, अगस्त्य मुनी असोत, भगवान श्रीकृष्ण असोत, गुरुदेव दत्त असोत, आदी शंकराचार्य असोत, भगवान बुद्ध असोत, भगवान महावीर असोत, श्रीपाद श्रीवल्लभ असोत, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या संतशृंखलेतील ज्ञानेश्वरांपासून ते तुकाराम महा
वऱ्हाड म्हणजे विदर्भ नव्हे. वऱ्हाड हा आजच्या विदर्भातला पश्चिमेकडचा प्रदेश. वऱ्हाड चे इंग्रजी रूप बेरार (berar) . वऱ्हाड एकेकाळी समृद्ध होता. वऱ्हाडात जिजाबाईंचे माहेर आहे. राजे उदाराम आणि राजे लखुजी जाधवरावांची जहागीरी वऱ्हाडात होती. वऱ्हाडातील काही ऐतिहासिक व्यक्तींच्या जीवनावर अभ्यासपूर्ण लेख आपल्याला “वऱ्हाडनामा” येथे वाचायला मिळतील.