माहूर येथील किल्ल्याचा हत्ती दरवाजा ई. स.१६१२ मध्ये अंबराने आपली राजधानी देवगिरीहून खडकीला हलवली. मलिक अंबराच्या सैन्याकडून अनेकदा पराभूत झाल्यानंतर मोगलांना अंबराची खरी ताकद कळू लागली होती. याच दरम्यान मलिक अंबर आणि मराठा सरदारांच्या एका गटामध्ये मतभेद उत्पन्न होऊ लागले होते. लखुजी जाधवराव आणि उदाजीराम हे त्यात मुख्य होते. त्यांच्यात नेमके काय मतभेद होते, हे ज्ञात नाही. पण याचा बराच फायदा मोगलांना झाला, हे मात्र निश्चित. पराजयाची मालिका कशी थांबवावी या पेचात असताना जहांगीर बादशहाने पुन्हा खान इ खानानला दख्खनचा सुभेदार नेमलं. खान इ खानान मोगलांमध्ये दख्खनचा जाणता होता. त्याच्या तीन मुलांना मनसबदारी आणि बक्षिसे देऊन त्याला मलिक अंबराचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवण्यात आलं. बाळापूर येथे मोगली सैन्याचा तळ पडला. आधीचे पराभव तो विसरला नव्हता. आता त्याने शांततापूर्ण पावलं उचलण्याचा निर्णय घेतला. पूर्वीप्रमाणेच मोगली सरदारांमध्ये आपसांत मतभेद, द्वेष ई. कायम होते. त्याने हळूहळू ही डोकेदुखी कमी केली. एक एक करून सरदार मरू लागले. आपल्या विरोधकांना संपवल...
वऱ्हाड म्हणजे विदर्भ नव्हे. वऱ्हाड हा आजच्या विदर्भातला पश्चिमेकडचा प्रदेश. वऱ्हाड चे इंग्रजी रूप बेरार (berar) . वऱ्हाड एकेकाळी समृद्ध होता. वऱ्हाडात जिजाबाईंचे माहेर आहे. राजे उदाराम आणि राजे लखुजी जाधवरावांची जहागीरी वऱ्हाडात होती. वऱ्हाडातील काही ऐतिहासिक व्यक्तींच्या जीवनावर अभ्यासपूर्ण लेख आपल्याला “वऱ्हाडनामा” येथे वाचायला मिळतील.