(१९४७ साली ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. य. खू. देशपांडे यांनी सिंदखेडराजा आणि देऊळगाव राजा या ऐतिहासिक स्थळांना भेट दिली. तेव्हा त्यांनी “जाधवांचिये नगरी” या आपल्या लेखात सिंदखेड येथील ऐतिहासिक वास्तूंची माहिती आणि परिस्थिती लिहून ठेवलेली आहे. त्याच लेखातील निवडक भाग खाली देत आहे. सदर लेखात दिलेल्या सिंदखेडच्या परिस्थितीत आजही विशेष काही बदल झालेला नाही. रंगमहाल आणि निळकंठेश्र्वर मंदिर (प्राचीन) ह्या वस्तू अतिशय दयनीय अवस्थेत आहेत. नीळकंठेश्र्वर मंदिराच्या परिसरात दारूच्या फुटलेल्या बाटल्या बघायला मिळतात. तसेच मंदिराच्या आत जंगली गवत उगवल्याचे लक्षात येते. आसपासच्या भागात अनेक देवीदेवतांच्या प्राचीन मूर्ती ऊन वारा पाऊस यांचा मार खाण्यासाठी सोडून दिलेल्या आढळतात.) जाधवांचिये नगरी : लखुजी जाधवांना शिंदखेडची देशमुखी मिळाल्यानंतरचे अनेक अवशेष सिंदखेड येथे आणि देऊळगावराजा येथे आहेत. शिंदखेडास सिद्धक्षेत्र म्हणत असत, असे गोसावीनंदन यांच्या ज्ञानमोदक ग्रंथावरून दिसते. क्षेत्र म्हणून अद्यापही त्याची प्रसिद्धी आहे. लखुजी जाधवांच्याही अगोदरच...
वऱ्हाड म्हणजे विदर्भ नव्हे. वऱ्हाड हा आजच्या विदर्भातला पश्चिमेकडचा प्रदेश. वऱ्हाड चे इंग्रजी रूप बेरार (berar) . वऱ्हाड एकेकाळी समृद्ध होता. वऱ्हाडात जिजाबाईंचे माहेर आहे. राजे उदाराम आणि राजे लखुजी जाधवरावांची जहागीरी वऱ्हाडात होती. वऱ्हाडातील काही ऐतिहासिक व्यक्तींच्या जीवनावर अभ्यासपूर्ण लेख आपल्याला “वऱ्हाडनामा” येथे वाचायला मिळतील.