भाग - २ १ ९३६-३७ साल होतं. राजा आणि कुंदनसिंह पोलिसांच्या फायरींग मध्ये मारले गेल्यानंतर शामा एकटाच उरला होता. वर्धा, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील जंगलांमधून तो दिवस काढू लागला. पोलिसांनी गावागावांतून दवंडी दिली - ‘कोणीही शामा कोलामला मदत करताना आढळला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल’. याआधी गावातून कोणी ना कोणी लाकूडफाटा तोडून आणायच्या बहाण्याने जंगलात जेवण, दारू आणून देत असे. आता ते ही बंद झाले. कधी रात्री एखाद्या कोलाम पाड्यात जाऊन असतील नसतील त्या भाकऱ्या घेऊन यावे आणि खावे असा त्याचा नित्यक्रम सुरू होता. कधी जेवण मिळे कधी न मिळे. कधी दहाबारा दिवसांचे शिळे अन्न खावे लागे. अशा हलाखीच्या परिस्थितीत शामा आपले दिवस काढू लागला. घर सोडून निघताना त्याने आपल्या भावंडांना आपल्या बायकोचं - भिवराचं - दुसरं लग्न लावुन द्यायला सांगितलं होतं. पण त्याच्या भितीमुळे कोणीच तिच्याशी लग्न करण्यास तयार होईना. घरच्यांनी एक स्थळ बघितलेलं होतं. पोलिसांचा त्रास थोडा कमी होताच शाम...
वऱ्हाड म्हणजे विदर्भ नव्हे. वऱ्हाड हा आजच्या विदर्भातला पश्चिमेकडचा प्रदेश. वऱ्हाड चे इंग्रजी रूप बेरार (berar) . वऱ्हाड एकेकाळी समृद्ध होता. वऱ्हाडात जिजाबाईंचे माहेर आहे. राजे उदाराम आणि राजे लखुजी जाधवरावांची जहागीरी वऱ्हाडात होती. वऱ्हाडातील काही ऐतिहासिक व्यक्तींच्या जीवनावर अभ्यासपूर्ण लेख आपल्याला “वऱ्हाडनामा” येथे वाचायला मिळतील.