राजे लखुजी जाधवराव सिंदखेडकर जाधवरावांच्या बखरीनुसार १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात सिंदखेडची जहागीरदारी एका काझी नावाच्या घराण्याकडे होती. ती जहागीर त्यांच्याकडे बहामनी काळापासून चालत आलेली होती. ई. स. १५७० च्या आसपास रवीराव धोंडे हा काझीचा दिवाण होता. धार्मिक वृत्तीचा काझी अध्यात्माकडे झुकल्याने त्याला जहागिरी च्या कारभारात विशेष रस नव्हता. रवीरावने याचा पुरेपूर फायदा घेतला. त्याने काझीकडून काही प्रशासकीय हक्क मिळवले. आणि हळू हळू आपले हातपाय पसरायला सुरूवात केली. काही काळातच त्याने काझीच्या विश्वासातल्या सगळ्यांचे खून करून पूर्ण मुलुख आपल्या ताब्यात घेतला. अर्थातच तोपर्यंत काझी स्वतः कमकुवत झाला होता. रवीरावचा धोका लक्षात येताच ‘ मुळे ’ नावाच्या काझीच्या वकीलाने रवीरावच्या विरोधात खटपटी सुरू केल्या. रवीरावने त्या वकीलाचा खून कराविला. त्यानंतर रविरावची नजर वकीलाच्या गरोदर पत्नीवर गेली. आपल्या पतीच्या खूनाने क्षुब्ध झालेल्या त्या स्त्रीने रवीरावापासून असलेला धोका ओळखला आणि त्याच्या हातात लागण्याआधीच ती आपल्या परिवाराला घेऊन पैठणचे देशमुख जाधवराव यांच्या आश्रयाला गेली. जाध
वऱ्हाड म्हणजे विदर्भ नव्हे. वऱ्हाड हा आजच्या विदर्भातला पश्चिमेकडचा प्रदेश. वऱ्हाड चे इंग्रजी रूप बेरार (berar) . वऱ्हाड एकेकाळी समृद्ध होता. वऱ्हाडात जिजाबाईंचे माहेर आहे. राजे उदाराम आणि राजे लखुजी जाधवरावांची जहागीरी वऱ्हाडात होती. वऱ्हाडातील काही ऐतिहासिक व्यक्तींच्या जीवनावर अभ्यासपूर्ण लेख आपल्याला “वऱ्हाडनामा” येथे वाचायला मिळतील.