Skip to main content

मुघलांपूर्वीचे वऱ्हाड

        १५ व्या शतकात दक्षिण भारतातली बहामनी सल्तनत कोसळल्यावर त्यातून ५ छोटी छोटी राज्ये उभी राहिली. अहमदनगरची निजामशाही (१४९०-१६३७), गोवळकोंड्याची कुतुबशाही(१५१८-१६८६), विजापूरची आदिलशाही(१४८९-१६८६), बिदरची बरिदशाही(१५२६-१६१९) आणि वऱ्हाडची इमादशाही(१४८४-१५७४).  ई. स. १५७४ मध्ये मूर्तजा निजामशाह ने वऱ्हाड प्रांत जिंकून आपल्या राज्याला जोडून घेतला. आणि इमादशाही संपुष्टात आली. पण निजामशाहीतील अंतर्गत कलहामुळे फार काळ निजामशाहीचा वऱ्हाडात अंमल राहू शकला नाही. मुर्तजा निजामशाह पहिला याच्या मृत्यूनंतर इब्राहिम निजामशाह गादीवर आला. त्याच्या मृत्यूनंतर निजामशाहीतल्या ४ अमीरांनी ४ दिशांना तोंडे फिरवली. प्रत्येकाने एकेक गादीचा दावेदार निवडला आणि ते आपसांत लढू लागले. त्यातला मियां मंझु नावाचा सरदार इखलास खानाविरुद्ध लढत असता पराभवाच्या उंबरठ्यावर पोहोचला, तेव्हा त्याने गुजरातेत स्थित मुघल बादशाह अकबराचा पुत्र शाहजादा मुराद, याची मदत मागितली. मुराद दख्खनच्या राजकारणावर नजर ठेऊन होता आणि योग्य संधी मिळण्याची वाट बघत होता. आता त्याला आयती संधी चालून आली होती. त्याने अकबराचा कौल घेतला आणि  आपल्या बापाचा दख्खन काबीज करण्याचा मनसुबा पूर्ण करण्यासाठी  तो गुजरातहून निघाला. मुर्तजा निजामशहाचा बाप  हुसेन निजामशाह याने आपली मुलगी अली आदिलशाह पहिला याला दिली होती. तिचे नाव चाँद बिबी.  तिने मियां मंझुला आपल्याकडे वळवून घेतले, निजामशाहीत आपला अंमल बसविला आणि इब्राहिमचा मुलगा बहादुर याच्या नावाने ती राज्य करू लागली. चालून आलेल्या मुघल फौजेने अहमदनगरला वेढा घातला. चाँद बिबीच्या सैन्याने कडवा प्रतिकार केला. दोन्ही सैन्यांची खूप शक्ती खर्च झाली. आणि अखेर ई. स. १५९५ मध्ये निजामशाही आणि मुघलांमध्ये तह झाला. त्या तहानुसार निजामशाहीच्या अधिपत्याखालील वऱ्हाड प्रांत मुघल साम्राज्याला जोडण्यात आला. चाँद बिबीने मुघल सैन्य परत जाऊ दिले. आणि मुघलांचा अंमल वऱ्हाडावर बसणार नाही याची काळजी घेतली.  वऱ्हाडातला काही भाग मुघलांच्या तर काही निझामशाहीच्या ताब्यात राहिला. आणि त्यामुळे तिथे कायम युद्धाचे वातावरण राहिले. लुटालूट जाळपोळ हा रोजचा प्रकार होता.
             वऱ्हाड प्रांत म्हणजे आजचे अमरावती, अकोला वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, हिंगोली, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांचा भाग.   त्याकाळी हा भाग खूप समृद्ध होता.  उत्तरेला तापी , पूर्वेला तसेच दक्षिणेला वैनगंगा, पैनगंगा आणि वर्धा नदी, आणि पश्चिमेला गोदावरी, ह्या नद्यांनी हा भाग वेढलेला होता. महुरचा रामगड किल्ला ही वऱ्हाडाची दक्षिण सीमा होती. तसेच  उत्तर सिमेला गाविलगड, नरनाळा हे मजबूत किल्ले होते.
              पुढे निजामशाहीत पुन्हा अंतर्गत कलह माजला आणि त्यातच ई. स. १६०० मध्ये त्या धाडसी चाँद बिबीचा खून झाला. निजामशाहीचा एक बळकट स्तंभ कोसळला. वर्षभरापूर्वी मुरादही मृत्यू पावला होता. काही दिवसातच शहजादा दानियालच्या अधिपत्याखाली मुघल फौजांनी अहमदनगर वर हल्ला केला आणि निजामशाहीची राजधानी ताब्यात घेतली. पण मुघलांच्या हातात जरी राजधानी आणि आजूबाजूचा प्रदेश आला असला तरीही संपूर्ण राज्य अजुन आले नव्हते. आपल्या जाण्यामुळे सैन्यात जोश निर्माण होईल म्हणून स्वतः बादशाह अकबर बुऱ्हाणपूरास येऊन राहिला. निजामशाही प्रदेशाच्या वेगवेगळ्या भागांवर राजू दख्खनी तसेच मलिक अंबर ह्या अमिरांचा अंमल होता. ते स्वतंत्रपणे राज्य करू लागले होते. मलिक अंबर हा एक हबशी गुलाम होता. नशिबाने त्याला हिंदुस्तानात आणले, आणि आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्याने निझामशाहीत महत्त्वाचे स्थान मिळवले होते. पुढे मलिक अंबर आणि राजू दक्खनी यांनी एकमुखाने मुर्तजा निजामशाह दुसरा याला गादीवर बसविले. काही काळातच अंबराने राजू दख्खनीचा पराभव करून निजामशाहीत आपला अंमल बसविला. त्याने मरेपर्यंत मुघलांना दख्खन काबीज करण्यापासून रोखून धरले. त्याच्या दिमतीला भोसले, जाधवराव, उदाराम देशमुख यांसारखे प्रभावी मराठा सरदार होते. या सर्व काळात वऱ्हाड प्रांतात मात्र राजकीय अस्थैर्य होते. धाडी, लुटालूट,जाळपोळ यांनी प्रजा जेरीस आलेली होती.

             
संदर्भ सूची :
१. Ain - i - akbari
२. कवींद्र परमानंद कृत श्री शिवभारत
३. मराठी रियासात : खंड २
४. Berar Under the Mughals - Dr. Mohd. Yaseen Quddusi
५. Malik Ambar - Dr. Joginder Nath Chowdhari



© Vinit Raje

Comments

  1. चांगला प्रयत्न विनित राजे 👍👍

    ReplyDelete
  2. प्रयत्न यशस्वी झाले👌👌
    अप्रतिम सादरीकरण✌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कोण होती रायबागन?

      “माहूरचा रामगड किल्ला”        ई. स. १६५८ मध्ये औरंगझेबाने आपल्या बापाविरुद्ध बंड पुकारले. त्याच्या दिमतीला बरेच राजपूत सरदार होते. मुघल साम्राज्यात दोन गट पडले, एक दारा शुकोहचा तर दुसरा औरंगझेबाचा. औरंगझेबाच्या बाजूने माहूरच्या राजे  उदाराम यांचा मुलगा जगजीवनराव लढत होता. आग्र्याजवळ समुगढ येथे  दारा आणि औरंगझेब यांच्यात निर्णायक लढाई झाली. या लढाईत जगजीवनराव मारला गेला. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या सैन्याचे नेतृत्व एका स्त्रीने केले. सैन्यात लढणाऱ्या एकमेव स्त्रीला औरंगझेबाने बघितले असावे. तिच्या असामान्य शौर्याने तो प्रभावित झाला.  त्या लढाईत औरंगझेबाचा विजय झाला. त्या लढणाऱ्या स्त्रीचा लौकिक सर्वत्र पसरला होता. औरंगझेबाने रीतसर गादीवर स्वतःला बसवून घेतल्यानंतर त्या स्त्रीस बोलाविण्याची आज्ञा केली. त्या प्रमाणे ती स्त्री दरबारात हजर झाली. ज्ञात झाले की ती माहूरचे मुघल सरदार राजे उदाजी राम यांची पत्नी आहे. तिचे नाव सावित्रीबाई. डोळ्यासमोर पोटच्या मुलाचा मृत्यू झालेला बघून देखील खचून न जाता ती प्राणपणाने लढली होती. औरं...

विदर्भाचे रॉबिनहुड - शामा दादा कोलाम भाग - १

                १९३५-३६ साल होतं. घनदाट जंगल असल्यामुळे अनेक हौशी शिकारी माहूर परिसरात तयार झाले होते. अनेक लोक बाहेरून येत. शिकारीसाठी काही दिवस माहूर किंवा आजूबाजूच्या गावी येऊन राहत. राजे उदाराम घराण्याच्या माहूर शाखेकडे अजूनही माहूरची जहागीरदारी होती.¹ माहूरचा कारभार त्या काळी राजे व्यंकटराव देशमुख उर्फ भाऊसाहेब बघत. त्यांच्याकडे एक शिकारी कामाला होता. त्याचे नाव राजा - शिकारी राजा². राजाचाच जिगरी दोस्त होता ‘ शामा कोलाम’.                शामाचा जन्म २६ नोव्हेंबर, १८९९ साली आदिवासी कोलाम समाजात माहूर गावीच झाला. वयाच्या तिसाव्या वर्षी भिवरा नावाच्या मुलीसोबत त्याचं दुसरं लग्न झालं. दोघांना मुलगा झाला. त्याचं नाव ठेवलं दशरथ. शामा गावच्या पाटलाकडे गडी म्हणून कामाला होता. कधी कधी भाऊसाहेबांनी सांगितलेली कामे देखील तो करत असे. भाऊसाहेब स्वतः शिकारीला जात त्यावेळी राजा आणि शामा त्यांच्याबरोबरच असत. शामा उत्कृष्ठ नेमबाज होता.                भाऊसाहेबांनी घरी दोन वाघ पाळले ...

सिंदखेडचे जाधवराव

राजे लखुजी जाधवराव          सिंदखेडकर जाधवरावांच्या बखरीनुसार १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात सिंदखेडची जहागीरदारी एका काझी नावाच्या घराण्याकडे होती. ती जहागीर त्यांच्याकडे बहामनी काळापासून चालत आलेली होती. ई. स. १५७० च्या आसपास रवीराव धोंडे हा काझीचा दिवाण होता. धार्मिक वृत्तीचा काझी अध्यात्माकडे झुकल्याने त्याला जहागिरी च्या कारभारात विशेष रस नव्हता. रवीरावने याचा पुरेपूर फायदा घेतला.  त्याने काझीकडून काही प्रशासकीय हक्क मिळवले. आणि हळू हळू आपले हातपाय पसरायला सुरूवात केली. काही काळातच त्याने काझीच्या विश्वासातल्या सगळ्यांचे खून करून पूर्ण मुलुख आपल्या ताब्यात घेतला. अर्थातच तोपर्यंत काझी स्वतः कमकुवत झाला होता. रवीरावचा धोका लक्षात येताच ‘ मुळे ’ नावाच्या काझीच्या वकीलाने रवीरावच्या विरोधात खटपटी सुरू केल्या. रवीरावने त्या वकीलाचा खून कराविला. त्यानंतर रविरावची नजर वकीलाच्या गरोदर पत्नीवर गेली. आपल्या पतीच्या खूनाने क्षुब्ध झालेल्या त्या स्त्रीने रवीरावापासून असलेला धोका ओळखला आणि त्याच्या हातात लागण्याआधीच ती आपल्या परिवाराला घेऊन पैठणचे देशमुख जाधवर...

माहूरचे राजे उदाराम

“माहूर येथील हत्तीखाना”                 मध्ययुगीन वऱ्हाडच्या राजकारणात लखुजी जाधवराव यांच्यानंतर नाव येते माहूरच्या राजे उद्धवजी रामजी उर्फ राजे उदाराम (Raja Udaram) यांचं. इसवी सनाच्या १७व्या-१८व्या शतकात वऱ्हाडात एक अनंत नावाचे कवी होऊन गेले. त्यांच्या “भक्तरहस्य” या काव्यात माहूरच्या राजे उदाराम यांच्या भाग्योदयाची कथा आढळते. भक्तरहस्यातील सगळाच भाग विश्वसनीय वाटत नाही. त्यामुळे यात निवडक भाग घेतलेला आहे. उदाजीराम यांचे मूळ नाव उद्धवजी रामजी. जसे मुघल कागदपत्रांमध्ये जाधवराव चे ‘जदूराय’ झाले, तसेच उद्धवजी रामजीचे ‘उदाजीराम’ झालेले आहे. सुरुवातीच्या काळात हे उदाजीराम वाशिम जवळच्या सावरगावचे कुळकर्णी होते. आजचे औरंगाबाद म्हणजे त्याकाळचे खडकी हे शहर अहमदनगरच्या निजामशाहीतील एक महत्त्वाचे शहर. भक्तरहस्यानुसार पद्माजी नावाच्या एका सत्पुरूषाच्या सांगण्यावरून उदाजीराम खडकी येथे आले. आपले कुळकर्णी पद सोडून खडकीला आल्यावर उद्धवजींनी एका अमीराचा वसिंदा म्हणजे लेखक म्हणून काम केले. खडकी मध्ये उदाजींनी प्रतिष्ठा कमावली. याच काळात त्यांनी सैनिकी शिक्...

Shama Kolam : The Accidental Bandit

  Life of Shama Kolam : Part One                 Shama Kolam , famously known as Robinhood of Vidarbha , was born on 26 th November, 1899 in village of Niranjan Mahur in Nanded district in an aboriginal ‘Kolam tribe’. It is said that Kolams are Dravidian. Their language – Kolami- has resemblance with Dravidian languages. 1 Kolams are mostly populated in Yavatmal district of Maharashtra state. They are spread to the other adjacent districts of Nanded, Adilabad & Chandrapur. It is one of the most backward aboriginal communities of India. Though they have some cultural semblance with Gonds, they are different from Gonds in many aspects. There’s no caste hierarchy in Kolams. They are mostly divided by surnames which have been adopted from the names of villlages. 2                Shama was born in one of the poor families and brought up in the adjacent jungles of Mahur ...

दख्खनचे राजकारण : ई. स. १६१६ ते १६२१

          ई. स. १६१६ च्या रोशनगावच्या लढाईत† सपाटून मार खाल्ल्यानंतर मलिक अंबरने आपले गमावलेले मराठा सरदार परत मिळवण्याचा प्रयत्न चालवला. त्यात वर्षभरात त्याला यश मिळालं. लखुजीराजे, उदाराम पंडित आणि बाबाजी कायथ यांनी मुघल छावणी सोडून निजामशाहीत पुनः प्रवेश केला. पण काही काळातच मलिक अंबर आणि मराठ्यांच्या ह्या गटातील मतभेद पुन्हा वर येऊ लागले. मलिक अंबरने बाबाजी कायथची कपटाने हत्या करवली. आणि राजे उदाराम यांना मारण्यासाठी सैन्य पाठवले. उदारामांनी त्या सैन्याचा पराभव केला. आणि निजामशाही मुलुखात धोका असल्याचे जाणून आदिलशहाशी पत्रव्यवहार सुरू केला. पण मलिक अंबर आणि आदिलशहाचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याने आदिलशाही दरवाजे त्यांच्यासाठी बंद झाले होते. अखेर मुघल सुभेदार खान खानान याच्याशी बोलणी करून उदाराम मुघल छावणीत दाखल झाले.           इकडे रोशनगावची लढाई संपते न संपते तोच जहाँगीर बादशहाने आपला मुलगा खूर्रम याला दक्षिणेत पाठवले. १६ ऑक्टोबर १६१६ रोजी शहजादा खुर्रम अजमेर हून निघाला आणि  ई. स. १६१७ च्या सुरुवातीला बुऱ्हाणपूरात येऊन दाख...

राजे जगदेवराव जाधव यांची दिनचर्या

राजे जगदेवराव जाधव यांचे समाधीस्थळ              वऱ्हाडात बुलढाणे जिल्ह्यात सिंदखेड राजा हे गाव जाधवांच्या वास्तव्यामुळे प्रसिद्ध आहे. श्रीशिवाजी महाराजांची माता जिजाबाई यांचे वडील राजे लखुजी जाधव यांनी सिंदखेडची देशमुखी इ. स. १५७५ च्या सुमारास संपादन केली. मोगल दरबारातून त्यांना १२००० फौजेची मनसब होती. फौजेच्या बेगमीकरिता सरकारी दौलताबाद येथील २७ महाल त्यांना दिले होते. याशिवाय सिंदखेड साकरखेल्डा, मेहकर इत्यादी महाल त्यांचे खासगत वतन होते. त्यांनी सिंदखेड येथे तलाव, बाग, महाल वगैरे बांधून तेथे वास्तव्य केले. प्रस्तुत राव जगदेव हे राजे लखुजी यांचे पणतु म्हणजे राजे लखुजींचा द्वितीय मुलगा राजे बहादूरजी, त्याचा मुलगा राजे दत्ताजी महाराज आणि राजे राव जगदेव हा त्यांचा मुलगा. या सर्वांना मोगल दरबारातून वरीलप्रमाणे मनसब असून त्याबद्दल बादशाही फर्मान होते. राजे दत्ताजी यास बादशहा अलमगीर याने कर्नाटकाकडील मोगल मुलखाच्या रक्षणार्थ फौजेसह नेमले होते. कलबुरेनजीक निलंगे येथे त्याची छावणी असता, विजापुरकर बादशहा लष्करासह त्याच्यावर चालून आला. मोठे घनघोर युद्ध झाले. त्...

“शामा कोलामचा रामराम पोहोचे”

भाग - २                  १ ९३६-३७ साल होतं. राजा आणि कुंदनसिंह पोलिसांच्या फायरींग मध्ये मारले गेल्यानंतर शामा एकटाच उरला होता. वर्धा, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील जंगलांमधून तो दिवस काढू लागला. पोलिसांनी गावागावांतून दवंडी दिली - ‘कोणीही शामा कोलामला मदत करताना आढळला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल’. याआधी गावातून कोणी ना कोणी लाकूडफाटा तोडून आणायच्या बहाण्याने जंगलात जेवण, दारू आणून देत असे. आता ते ही बंद झाले. कधी रात्री एखाद्या कोलाम पाड्यात जाऊन असतील नसतील त्या भाकऱ्या घेऊन यावे आणि खावे असा त्याचा नित्यक्रम सुरू होता. कधी जेवण मिळे कधी न मिळे. कधी दहाबारा दिवसांचे शिळे अन्न खावे लागे. अशा हलाखीच्या परिस्थितीत शामा आपले दिवस काढू लागला.                घर सोडून निघताना त्याने आपल्या भावंडांना आपल्या बायकोचं - भिवराचं - दुसरं लग्न लावुन द्यायला सांगितलं होतं. पण त्याच्या भितीमुळे कोणीच तिच्याशी लग्न करण्यास तयार होईना. घरच्यांनी एक स्थळ बघितलेलं होतं. पोलिसांचा त्रास थोडा कमी होताच शाम...

मराठ्यांचे महत्त्व १ : मलिक अंबर !

 देवगिरी किल्ल्याचे भग्नावशेष          मलिक अंबराच्या कारकिर्दीतील निजामशाहीचा इतिहास म्हणजे मुघल आणि दख्खनी शाह्या यांच्यातील संघर्षाचा इतिहास आहे. मलिक अंबराने निझाम, आदिल, कुतुब या तिन्ही शह्यांना एकत्र आणून मुघलांना जवळजवळ वीस वर्ष दख्खन काबीज करण्यापासून रोखून धरलं. गनिमी कावा युद्धतंत्राने त्याने मुघली फौजांना हैराण करून सोडलं. आणि त्यात त्याला सगळ्यात जास्त मदत झाली ती मराठ्यांच्या चपळ सैन्याची. ह्या कारणामुळे अंबराच्या कार्यकाळात मराठ्यांचा उदय झाला. पण याचा अर्थ मलिक अंबराचे मराठ्यांवर काही विशेष उपकार आहेत असा होत नाही.            ई. स. १६०७ मध्ये मलिक अंबराने राजू दख्खनीला कैद करून त्याच्या अखत्यारीतला मुलुख निजामशाही राज्याला जोडला आणि संपूर्ण निजामशाही सत्ता आपल्या वर्चस्वाखाली आणली. पुढे मुर्तझा निझामशाह दुसरा याच्याशी असलेले मतभेद संपवून त्याने आपला मोर्चा मोगलांकडे वळवला. तोपर्यंत मुघलांनी अहमदनगर आणि बराच निजामशाहीचा मुलुख काबीज केला होता. ई. स. १६०५ मध्ये अकबराच्या मृत्यूनंतर जहांगीर गादीवर आला, पण सुर...