अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्याच्या पूर्वेस १२ किमीवर अडगांव बुद्रुक नावाचं गाव आहे. गेल्या शतकभरापासून वऱ्हाडच्या संतपरंपरेच्या इतिहासातील एक सोनेरी पान येथे विसावा घेते आहे. भास्कर महाराज हे सद्गुरू श्री गजानन महाराजांचे पट्टशिष्य. त्यामुळे या गुरुशिष्यांच्या उल्लेखावाचून वऱ्हाडच्या संतपरंपरेचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. गजानन महाराज आणि योगमार्ग ह्या लेखात काही विषयांवर चर्चा करत त्यांचा उहापोह करण्याचा प्रयत्न केला आहे. गजानन महाराजांच्या सान्निध्याचं गांभीर्य समजून घेण्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचं आहे. या हिंदुभूने हजारों वर्षे खत पाणी घालून वाढविलेल्या योगविज्ञानाच्या वृक्षाचे भास्कर महाराज हे एक फळ आहेत. या भूमीवर हजारो योगी होऊन गेले. त्यांनी कायम जनसामान्यांच्या आयुष्यात आध्यात्मिक ज्योत पेटविण्याचा प्रयत्न केला. मग ते आदियोगी शिव असोत, अगस्त्य मुनी असोत, भगवान श्रीकृष्ण असोत, गुरुदेव दत्त असोत, आदी शंकराचार्य असोत, भगवान बुद्ध असोत, भगवान महावीर असोत, श्रीपाद श्रीवल्लभ असोत, महाराष्ट्रातील वारकरी संप्र...
🌸~~~वऱ्हाडातील संतपरंपरा !~~~🌸 “कुवतअलिशहा मियाँसाहेब उर्फ मियाँसाहेब महाराज” अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात, अकोट शहराच्या वायव्येस काही मैलांवर ‘उमरा’ नावाचे गाव आहे. तिथे संत कुवतअलिशहा मियांसाहेब यांची समाधी आहे. मियांसाहेब महाराज हे मूळचे पंजाबचे होते. इसवी सन १८५० च्या सुमारास ते उमरा येथे आले. ते महाराष्ट्रात कसे व का आले, याची इतिहासाला माहिती नाही. पण अकोटचे प्रसिद्ध संत नरसिंह महाराज तसेच दिवठाणा, अडगावचे संत एकनाथ महाराज यांचे ते गुरु होते. अकोट येथे दरवर्षी शेकडो भाविक भक्तांच्या उपस्थितीत नरसिंह महाराजांची यात्रा भरत असते. “लोकांना सर्वप्रथम मियाँसाहेब महाराज कसे ज्ञात झाले ?” रात्रीच्या वेळी उमरा गावात एक अवलिया येऊन भिक्षा मागत असत. पण त्यांची भिक्षा मागायची पद्धत जरा निराळी होती. “हाजिर हूआ तो भेज ” असं मोठ्याने ओरडून ते ‘मी असेपर्यंत भिक्षा आणून दे’ अशी मागणी करीत असत. पूर्वी दारात आलेल्या प्रत्येक अतिथीचे यथातथ्य सोपस्कार करण्याची पद्धत असे. त्यामुळे लोक घाईघाईने त्यांच्यासाठी भिक्षा घेऊन जात. पण दारात पोहोचेपर्यंत ते महाराज तिथून निघून गेलेले असत. बरेच दिवस ...